बायबल · Indian Revised Version (Marathi)
स्तोत्रसंहिता 134
1 परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.
2 पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा; आणि परमेश्वरास धन्यवाद द्या.
3 आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो.
Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0