बायबल · Indian Revised Version (Marathi)

स्तोत्रसंहिता 13

1 हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?

2 पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?

3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर.

4 मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील.

5 परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.

6 मी परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे.

Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0