बायबल · Indian Revised Version (Marathi)

स्तोत्रसंहिता 126

1 सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले.

2 मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.

3 परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; आम्ही किती हर्षित झालो आहोत!

4 परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे आम्हास बंदिवासातून परत आण.

5 जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.

6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.

Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0