बायबल · Indian Revised Version (Marathi)

स्तोत्रसंहिता 122

1 आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.

2 हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.

3 हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.

4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.

5 कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.

6 यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.

7 तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.

8 माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.

9 परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.

Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0